​लिव्ह-इन पार्टनरवर चाकूने हल्ला; चिमुरडीचे अपहरण

​पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – एकत्र राहत नसण्याच्या कारणावरून एका तरुणाने त्याच्या लिव्ह-इन पार्टनर महिलांवर चाकूने हल्ला केला. तसेच त्यांच्या दोन वर्षांच्या मुलीला पळवून नेले. ही घटना १ जुलै रोजी दुपारी खेड तालुक्यातील आंबेठाण परिसरात घडली आहे.
याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. चांगदेव नागनाथ मुंडे (वय ३०, रा. मैंदवाडी, बीड) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी हे दोन वर्षांपासून एकत्र राहत होते. त्यांना स्वरा नावाची मुलगी आहे. आरोपी दारू पिऊन मारहाण करत असल्याने फिर्यादी वेगळ्या राहत होत्या. याच रागातून आरोपीने चाकूने फिर्यादीच्या डाव्या छातीवर वार करून तिला जखमी केले. तसेच मुलीला सोबत घेऊन गेला. उत्तर महाळुंगे पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *