pimpri chinchwad-आळंदीत कारखाली चिरडून दोन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू; डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल,

पिंपरी दि. ३(pimpri chinchwad) -आळंदीत कारखाली चिरडून दोन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू; डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल,सीसीटीव्हीत अपघात कैद; नागरिकांनी पाठलाग करून चालकाला पकडले.

आळंदी येथे दोन वर्षीय चिमुरडीचा भरधाव कारखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ३० जून रोजी घडली आहे. या प्रकरणी कारचालक असलेल्या डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रथमेश कोकणे (वय २६) असे गुन्‍हा दाखल करण्‍यात आलेल्‍या डॉक्‍टरचे नाव आहे. श्रुतिका मिरासे असे मृत्‍यूमुखी पडलेल्‍या दोन वर्षीय बालिकेचे नाव आहे. धडकेनंतर कारच्या पुढील आणि मागील चाकाखाली चिमुरडी आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून निघून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क नागरिकांनी त्याचा पाठलाग करून चिंबळी फाट्याजवळ त्याला अडविले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.
यासंदर्भात आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी सांगितले की, संबंधित गुन्हा हा जामीनपात्र स्वरूपाचा असल्याने कायद्यानुसार तात्काळ अटक करता येत नाही. आरोपी डॉक्टरला नोटीस बजावण्यात आली असून, तो गेल्या दोन-तीन दिवसांपासून तपासात सहकार्य करत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध आवश्यक अहवालासह न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *