कामावरून काढल्याच्या रागातून तरुणावर धारदार शस्त्राने वार

पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – कामावरून काढून टाकल्याचा राग मनात धरून एका तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. ही घटना भोसरी एमआयडीसी परिसरातील स्पाईन मॉलसमोर २ जुलै रोजी रात्री दहा वाजताच्‍या सुमारास घडली आहे.
महेश दीपक सांगळे (वय २६, रा. दौंड, पुणे) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी राहुल कुमार श्रीअकलु दास (वय २८, रा. निगडी, मूळ रा. बिहार) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल कुमार हे स्पाईन मॉलजवळ मित्राला भेटून फोनवर बोलत जात होते. तेव्हा पूर्वी त्यांच्याकडे कामाला असणारा आरोपी महेश तिथे आला व त्याने कामावरून काढल्याच्या रागातून धारदार शस्त्राने फिर्यादीच्या डोक्यावर, कानाजवळ आणि पाठीवर वार करून गंभीर जखमी केले. पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *