आळंदी आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा २०२६ निमित्त आळंदी येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल होत आहेत. सध्या इंद्रायणी नदीतील पाण्याची पातळी वाढलेली असून पाण्याचा प्रवाहही वेगवान आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, या साठी सर्व भाविक, नागरिक व वारकरी बांधवांनी इंद्रायणी नदी पात्रात स्नान करण्यासाठी अथवा अन्य कोणत्याही कारणासाठी उतरू नये, असे आवाहन आळंदी नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी माधवराव खांडेकर यांनी केले आहे.
भाविकांनी नदी काठा वरील सुरक्षा सूचना, बॅरिकेडिंग तसेच प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन पथकांच्या सूचनांचे काटेकोर पणे पालन करावे. आपल्या सुरक्षिततेसाठी नदीपात्रात जाण्याचा कोणताही प्रयत्न करू नये. तो धोकादायक ठरेल.
आळंदी नगरपरिषद, पोलीस प्रशासन, महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा व स्वयंसेवक आपल्या सेवेत कार्यरत आहेत. सर्वांनी जबाबदार नागरिक म्हणून सहकार्य करून सुरक्षित व सुरळीत पालखी प्रस्थान सोहळ्याचे नियोजनास सहकार्य करण्याचे आवाहन आळंदी नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.
lइंद्रायणी नदी पात्रात उतरू नये भाविकांना आळंदी नगरपरिषदेचे आवाहन
