मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पावरून सुरू असलेल्या राजकीय वादात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सांगली-ईश्वरपूर रस्त्याच्या मुद्द्यावरून त्यांनी जयंत पाटील यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
गोपीचंद पडळकर म्हणाले, “ज्याला सांगली-ईश्वरपूरचा रस्ता ४० वर्षांत करता आला नाही, तो आता कनेक्टिंग लिंकचा मुका घ्यायला निघाला आहे. बारामती ते फलटण हा रस्ता अनेक वर्षे प्रलंबित होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर तो हायवे तयार झाला. ज्यांना स्वतःच्या मतदारसंघातील प्रश्न सोडवता आले नाहीत, ते आता मिसिंग लिंकवर भाष्य करत आहेत.”
मिसिंग लिंक प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच पडळकर यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
