चिंचवड येथील एम्पायर इस्टेट ब्रिजवर भीषण अपघात हडपसरमधील २९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

पिंपरी-​चिंचवड :
चिंचवड येथील एम्पायर इस्टेट ब्रिजवर मंगळवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने दुभाजकाला (डिवायडर) धडक दिली. या अपघातात एका तरुण दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला मुलगा हडपसर ला राहायला आणि आई वडील दर्शन नगरी मध्ये राहतात.

​आदित्य बसलिंगप्पा मिटी (वय २९, रा. हडपसर, पुणे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकी स्वार तरुणाचे नाव आहे. आदित्य हा मंगळवारी (दि. ५ मे) रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास एम्पायर इस्टेट ब्रिजवरून आपल्या दुचाकीवरून जात होता. यावेळी दुचाकीचा वेग प्रचंड असल्याने एम्पायर इस्टेट वसाहतीजवळ आदित्यचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट दुभाजकाला जाऊन धडकली.

​भीषण वास्तव:
धडक इतकी जोरात होती की आदित्य गंभीररीत्या जखमी झाला आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

​अग्निशामक दलाने स्वच्छ केला रस्ता
​अपघातानंतर पुलावर रक्ताचा सडा पडला होता. पहाटेच्या वेळी रक्तामुळे रस्ता निसरडा होऊन इतर वाहनांना धोका निर्माण होऊ नये, यासाठी तातडीने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. जवानांनी पाण्याचा मारा करून रस्ता पूर्णपणे धुवून स्वच्छ केला.

​पोलीस तपास सुरू
​घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आदित्यचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, याप्रकरणी पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहेत. भरधाव वेग पुन्हा एकदा एका निष्पाप जीवाच्या जीवावर बेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *