Nagpur-अ‍ॅक्युपंक्चर उपचारपद्धतीच्या विस्तारासाठी शासन कटिबद्ध; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

नागपूर | प्रतिनिधी

अ‍ॅक्युपंक्चर उपचारपद्धतीमुळे अनेक रुग्णांना विविध आजारांपासून दिलासा मिळत असून, या उपचारपद्धतीचा प्रसार आणि शैक्षणिक विस्तार करण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित नॅशनल कॉन्फरन्स ऑन अ‍ॅक्युपंक्चर – २०२६’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतःचा अनुभव सांगताना, “सुमारे २३ ते २४ वर्षांपूर्वी मी पाठदुखीने त्रस्त होतो. त्यावेळी अ‍ॅक्युपंक्चर उपचारपद्धतीमुळे मला मोठा लाभ झाला आणि मी पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकलो,” असे सांगितले.

ते पुढे म्हणाले की, अ‍ॅक्युपंक्चर ही उपचारपद्धती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, तिचा अभ्यास, संशोधन आणि शैक्षणिक विकास व्हावा यासाठी शासन सकारात्मक असून, शासकीय पातळीवर कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र कौन्सिल ऑफ अ‍ॅक्युपंक्चरचे डॉ. रूमी बेरामजी, इंडियन सोसायटी ऑफ मेडिकल अ‍ॅक्युपंक्चरचे अध्यक्ष डॉ. रमण कपूर, तसेच डॉ. नारायण नवले, डॉ. प्रदीप गुहा आणि देशभरातील अ‍ॅक्युपंक्चर क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *