दारू विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा

पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – गावठी दारू तयार करण्याचे रसायन बाळगून त्याची विक्री करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. १४ जुलै) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पठारे वस्ती, बहुळ गाव येथे करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट-३ चे पोलीस कॉन्स्टेबल सुधीर दांगट यांनी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आरोपीने तिच्या ताब्यातील ड्रममध्ये ३०० लिटर उग्र वासाचे गावठी दारू तयार करण्याचे रसायन ठेवले होते. या रसायनाची किंमत १५ हजार रुपये असून, यामध्ये मानवी शरीराला घातक ठरणारे घटक आहेत हे माहीत असतानाही ती बिनापरवाना स्वतःच्या फायद्यासाठी याची चोरून विक्री करत होती. चाकण दक्षिण पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *