Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

Pimpri-Chinchwad-रावेत–नऱ्हे एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या कामाला लवकर सुरुवात – शंकर जगताप

By Sumedh Chapalgaonkar
July 18, 2026 2 Min Read
0

– पिंपरी चिंचवड शहराच्या वाहतूक सक्षमीकरणाच्या दृष्टीने पुढचे पाऊल!

– आमदार शंकर जगतापांच्या पाठपुराव्याला यश

– रावेत–नऱ्हे ‘डीपीआर’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा हिरवा कंदील;

पिंपरी, 18 जुलै ( प्रतिनिधी) : पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आमदार शंकर जगताप यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. रावेत ते नऱ्हे या 32 किलोमीटरच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी सुमारे सहा हजार कोटी रुपयांच्या सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) मंजूर केला असून लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले असल्याची माहिती आमदार जगताप यांनी शनिवारी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि 18) पुणे येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत पुणे-शिरुर उन्नत द्रुतगती महामार्ग, तळेगाव-चाकण-शिक्रापूर उन्नत महामार्ग आणि हडपसर-यवत उन्नत महामार्गांचे भूमिपूजन केले यावेळी या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.

आमदार शंकर जगताप याबाबत म्हणाले,
पुणे–बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाढती वाहतूक, हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या वाहनांची संख्या आणि पिंपरी-चिंचवड शहराचा वेगाने होणारा विस्तार यामुळे रावेत ते नऱ्हे हा एलिव्हेटेड कॉरिडॉर तातडीने मंजूर करावा, अशी आग्रही मागणी 23 मार्च 2026 रोजी हिवाळी अधिवेशनात केली होती. तसेच राज्य आणि केंद्र सरकारकडे या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. आज या कामावर शिक्कामोर्तब झाले असून लवकरच कामाला सुरुवात होईल. यातून वाहतूक सक्षमीकरणाच्या दृष्टीने पिंपरी चिंचवडकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या रस्त्यामुळे वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे तसेच बालेवाडी, बाणेर, सुस आणि बावधन परिसरातील वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे. हिंजवडी आयटी पार्ककडे ये-जा करणाऱ्या वाहनांचा प्रवास अधिक गतिमान होऊन दैनंदिन वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. याशिवाय माण, मारुंजी, नेरे, जांबे आणि कासारसाई परिसरातील नागरिकांनाही या प्रकल्पाचा थेट लाभ मिळेल. मुंबई–बंगळूर महामार्गावरील वाहनांचा वेग वाढण्याबरोबरच प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार असल्याचा विश्वास आमदार जगताप यांनी व्यक्त केला आहे.

राज्य आणि केंद्र सरकारच्या समन्वयातून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात येत आहे. आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून कॉरिडॉरच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले.
…………………………………..

प्रतिक्रिया

“पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिवेशनात ठामपणे मांडला होता. त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. या प्रयत्नांना यश मिळाले असून रावेत–नऱ्हे एलिव्हेटेड कॉरिडॉर शहराच्या भविष्यातील सक्षम वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग ठरेल.”

— शंकर जगताप,
आमदार, चिंचवड विधानसभा मतदारसंघ.

………..

दृष्टिक्षेपात प्रकल्प

मार्ग : रावेत ते नऱ्हे (32 किलोमीटर)
अंदाजित खर्च : सुमारे 6 हजार कोटी रुपये
लाभ : पिंपरी-चिंचवड, हिंजवडी आयटी पार्क आणि पुण्याच्या पश्चिम भागाला दिलासा
प्रमुख फायदा : मुंबई–बंगळूर महामार्गावरील वाहतूक कोंडीत घट

Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

Pune-​पुण्याचा कायापालट होणार; २०३० पर्यंत शहर देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next

Mumbai-एसटी प्रवाशांना मोठा झटका! आज मध्यरात्रीपासून तिकीटदरात १३.५६ टक्के वाढ; राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
  • बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल
  • दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

CATEGORIES

  • Uncategorized (439)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (877)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
July 23, 2026

Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून वडीवळे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : राजगड (वेल्हा) तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माळवडी–जोगवडी–भुतुंडे–बालवड–शेनवड या प्रमुख मार्गावरील बालवड येथे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविणाऱ्या महत्त्वाकांक्षी नाशिक फाटा–खेड दुहेरी उन्नत कॉरिडॉर...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल

Sumedh Chapalgaonkar

​पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – एका बेकरीत बालमजुराला कामावर ठेवल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या एका महिलेला दारूबंदी पथकाने...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

बँक खाते वापरण्‍यास देऊन ११ लाखांची सायबर फसवणूक

Sumedh Chapalgaonkar

​पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बँक खाते उघडून संघटित सायबर गुन्हेगारी टोळीला फसवणुकीचे पैसे स्वीकारण्यासाठी...

Read More
July 23, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme