Delhi-उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! लोकसभा अध्यक्षांची ६ खासदारांच्या विलिनीकरणाला मंजुरी; शिंदे गटाची ताकद वाढली

नवी दिल्ली : प्रतिनिधी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा राजकीय धक्का देत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पक्षातील सहा खासदारांच्या विलिनीकरणाला अधिकृत मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे हे सर्व खासदार अधिकृतपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन झाले असून, लोकसभेतील शिंदे गटाची ताकद आणखी वाढली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी करत उद्धव ठाकरे गटातील तब्बल सहा खासदार आपल्या पक्षात आणले होते. या घडामोडीनंतर उद्धव ठाकरे गटाने लोकसभा अध्यक्षांकडे धाव घेत संबंधित खासदारांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, सुनावणीनंतर लोकसभा अध्यक्षांनी विलिनीकरण वैध ठरवत त्यास मंजुरी दिली.

याचबरोबर पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांच्या विलिनीकरणालाही लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित खासदारांच्या गटांनी दुसऱ्या पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतल्याचे ग्राह्य धरत अध्यक्षांनी निर्णय दिला.

या निर्णयामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून, आगामी राजकीय समीकरणांवर त्याचे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, शिंदे गटाने या निर्णयाचे स्वागत करत लोकशाही प्रक्रियेचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *