पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – बॅनर लावण्याच्या वादातून तरुणाला शिवीगाळ करत खुर्चीने मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (२० जुलै) रात्री ८.४० वाजण्याच्या सुमारास रावेत येथील बीआरटी रोडवर घडली.
या प्रकरणात तुषार दिलीप खिलारे (२६, निगडी, पुणे) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश राऊत, अक्षय हिप्पारकर (रावेत), आदित्य ( रावेत) आणि बुट्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र बॅनर लावण्याबाबत चर्चा करत असताना आरोपींनी त्यांच्याशी हुज्जत घालून शिवीगाळ केली. फिर्यादीने विरोध केला असता आरोपींनी त्यांना हाताने आणि खुर्चीने मारहाण करून हाताला गंभीर दुखापत केली व धमकी देऊन पसार झाले. रावेत पोलीस तपास करीत आहेत.
बॅनर लावण्याच्या वादातून तरुणाला मारहाण
