ताथवडे येथे बेकायदेशीरपणे कोयता बाळगणारा तरुण अटकेत
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – पोलीस आयुक्तांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग करून घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (२१ जुलै) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ताथवडे येथे करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल कौतेय खराडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी अभिषेक सिद्धाराम मौसलगी (२४, शिवप्रेमी नगर, पुनावळे, पुणे; मूळ – जापूर, कर्नाटक) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात शस्त्र बाळगण्यास मनाई आदेश लागू असतानाही आरोपीने आपल्याकडे ५०० रुपये किमतीचा लोखंडी कोयता बाळगला होता. तो कोणती तरी गंभीर घटना घडवण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
———–