Pimpri-Chinchwad-महावितरणचा ढिसाळ कारभार व नागरिक त्रस्त

पिंपरी/चिंचवड
गेले दोन ते तीन महिन्यांपासून चिंचवडगाव व परिसरात विद्युत पुरवठ्याचा सारखा खेळखंडोबा होत आहे म्हणजेच वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे त्यामुळे चिंचवडगाव, केशवनगर ,तानाजी नगर व परिसरातील नागरिक अत्यंत त्रस्त झालेले आहे खरंतर विद्युत पुरवठा खंडित होण्याची कारणेअत्यंत छोटी असतात परंतु योग्य नियोजन नसल्यामुळे अनेक वेळा कधी चार /पाच /सहा तर कधी आठ तास विद्युत पुरवठा खंडित होतो अनेक वेळा खाजगी एजन्सी वेळेत न भेटणे ,केबल टेस्टिंग गाडी वेळेत न मिळणे ही महत्त्वाची कारणे पुढे केली जातात परंतु या दोन गोष्टीचे नियोजन अधिकाऱ्यांनी करणे गरजेचे आहे नियोजनाचा अभाव असल्यामुळे याचा जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे अनेक ठिकाणी खाजगी एजन्सीच महावितरण चे काम करत आहे मग खाजगी एजन्सी मनमानी करत असेल तर वरिष्ठ अधिकारी गप्प का बसतात.
तरीही वरिष्ठांनी यात योग्य वेळी लक्ष टाकावे व यापुढे विद्युत पुरवठा वारंवार खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा जनतेच्या रोशाला अधिकाऱ्यांनाच सामोरे जावे लागेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *