शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकास अटक
पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे शस्र बाळगल्या प्रकरणी रावेत पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली. ही कारवाई गुरुवारी (२३ जुलै) दुपारी बारा वाजताच्या सुमारास म्हस्के वस्ती, रावेत येथे केली.
विनायक सर्जेराव वारके (३७, चिंचवड) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विनायक मराठे यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हस्के वस्ती रावेत येथील म्हस्के पाठशालेच्या पाठीमागे एकजण कोयता घेऊन आला असल्याची माहिती रावेत पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून विनायक वारके याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ८०० रुपये किमतीचा एक कोयता आढळून आला. पोलिसांनी त्याला अटक करत शस्त्र जप्त केले आहे.