पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – हॉटेलला रेटिंग देण्याच्या टास्कमध्ये सहभाग घेतल्यास आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून चोरट्याने एकाची सात लाख ९४ हजार ३९२ रुपयांची फसवणूक केली. ही घटना पिंपरीगावात २२ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर २०२५ दरम्यान शिवदत्तनगर येथे घडली.
या प्रकरणात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिवदत्तनगर, पिंपरीगाव येथील एका नागरिकाने शनिवारी (दि. १३ जून) रोजी पिंपरी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. ५ स्टार हॉटेल्सला रेटिंग देण्याचे टास्क केल्यास मोठा नफा होईल असे सांगून वेगवेगळ्या युपीआय आयडीवर सात लाख ९४ हजार ३९२ रुपये पाठविण्यास सांगून फसवणूक केली. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.
हॉटेल रेटिंगच्या बहाण्याने आठ लाखांची फसवणूक
