पेट्रोल पंपावर २५ लाखांचा अपहार; तिघांवर गुन्हा

​पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – बँक खात्यात यूपीआयद्वारे पैसे वळवून आणि स्टॉक रजिस्टरमध्ये खोटे हिशोब लिहून २५ लाख रुपयांचा अपहार केला. ही घटना १ एप्रिल २०२५ ते २२ मे २०२५ दरम्यान मावळ तालुक्यातील आंबी येथील आदित्य पेट्रोल पंपावर घडली. याप्रकरणी तिघांवर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.
संजय रमेश बावीसकर (रा. कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली आहे. धर्मेंद्र रामाश्रय पांडे (रा. जमशेदपूर, झारखंड), विजय बाबुराव त्रिभुवन (रा. वराळे, मावळ) आणि चैतन्य विठ्ठल चांदेकर (रा. मनोहर नगर, तळेगाव दाभाडे) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून पेट्रोल व डिझेलचे पैसे स्वतःच्या व इतर कामगारांच्या बँक खात्यावर यूपीआयद्वारे पाठवून २५ लाखांची फसवणूक केली. तळेगाव एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *