Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
राज्य

नवीन कामगार संहितांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज : कामगार मंत्री आकाश फुंडकर

By Team News Beez
June 17, 2026 2 Min Read
0

मुंबई, दि. १७ : बदलत्या औद्योगिक आणि आर्थिक परिस्थितीत नवीन कामगार संहितांची प्रभावी अंमलबजावणी ही काळाची गरज असून त्यासाठी सक्षम, प्रशिक्षित आणि अभ्यासू अधिकारी वर्ग तयार होणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी केले. प्रशिक्षण घेत असलेल्या अधिकाऱ्यांनी केवळ प्रशिक्षणार्थी म्हणून न राहता ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून विकसित व्हावे आणि नवीन कामगार कायद्यांचे ज्ञान विभागातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

परळ येथील ना. मे. लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेच्या वतीने आयोजित ‘नवीन कामगार संहिता आणि कामगार कायद्यातील बदल’ या विषयावरील चार दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मंत्री फुंडकर म्हणाले की, कामगार विभाग हा शासन आणि समाज यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा आहे. कामगारांचे हक्क, त्यांचे संरक्षण, सामाजिक सुरक्षा तसेच उद्योगांच्या प्रगतीसाठी विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याने आपली जबाबदारी संवेदनशीलतेने, कार्यक्षमतेने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पार पाडली पाहिजे.

नवीन कामगार संहितांमुळे कामगार आणि उद्योग क्षेत्रात अनेक बदल घडणार असून या बदलांची योग्य माहिती संबंधित घटकांपर्यंत पोहोचविणे ही अधिकारी वर्गाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. या संहितांचा लाभ कामगार आणि उद्योग या दोन्ही घटकांना मिळावा यासाठी अधिकारी वर्गाने सक्रिय भूमिका बजावावी, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमात संस्थेच्या संचालक रोशनी कदम-पाटील यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाची उद्दिष्टे स्पष्ट करताना नवीन कामगार संहितांच्या अंमलबजावणीत अधिकारी वर्गाची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. या प्रशिक्षणाद्वारे अधिकाऱ्यांना नव्या कायद्यांची सखोल माहिती मिळून त्यांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास राज्यातील विविध विभागांमधून आलेले कामगार विभागाचे अधिकारी, प्रशिक्षणार्थी तसेच संस्थेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन कामगार संहितांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षित आणि सक्षम अधिकारी वर्ग हीच खरी ताकद असल्याचा संदेश या प्रशिक्षण कार्यक्रमातून देण्यात आला.

ना. मे. लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेच्या वतीने या चार दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, राज्यातील कामगार प्रशासन अधिक सक्षम आणि अद्ययावत करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

Tags:

Need for trained manpower for the effective implementation of new labour codes: Labour Minister Akash Fundkar
Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

भारतात फॉर्म्युला-1च्या पुनरागमनाचे संकेत; योग्य वेळ आल्यावर भारतीय ग्रांप्री नक्कीच होईल – स्टेफानो डोमेनिकाली

Next

Pimpri-Chinchwad आरटीओ कार्यालयाला संपाचे कुलूप

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme