एकलहरे येथे राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकारी सदस्य यांच्या नियुक्तीचा व ओळखपत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न.

राज्य मराठी पत्रकार परिषद चे केंद्रीय अध्यक्ष संस्थापक माननीय मधुसूदन कुलथे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय समिती संचालक माननीय राजेंद्र बिर्लाजी.. राज्य उपाध्यक्ष प्रवीण शिंदे..महाराष्ट्र राज्य निरीक्षक संदीपजी नाईक.. पुणे जिल्हा अध्यक्ष रायचंद शिंदे.. कार्याध्यक्ष आयुब शेख..पुणे जिल्हा उपाध्यक्ष जयवंत शिरतर. यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व नियोजनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन बेंगलोर कॅफे एकलहरे येथे करण्यात आले होते.. सर्वप्रथम राज्य व पुणे जिल्हा यांचे वतीने केंद्रीय अध्यक्ष व केंद्रीय संचालक यांचा सत्कार करण्यात आला..
यावेळी पुढील प्रमाणे नियुक्ती झालेल्या जिल्हा व तालुका पदाधिकारी यांना ओळखपत्र व नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले ..
यावेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष जयवंत शिरतर..जुन्नर तालुका अध्यक्ष सचिन डेरे.. जिल्हाध्यक्ष रायचंद शिंदे.. राज्य निरीक्षक संदीपची नाईक यांनी उपस्थित पत्रकारांना पत्रकारिता करत असताना आपण जी काही आपली नीती मूल्य आहे ती घसरू देऊ नयेत व आपलं योगदान हे समाजातील सामाजिक व समाज उपयोगी बातम्यांसाठी नेहमी ठेवावं असे आपल्या भाषणात संबोधित केले..
यावेळी पुणे जिल्हा संपर्कप्रमुख दौंड विभाग बाबा इनामदार.. जुन्नर तालुका सचिव हमीद सय्यद कार्याध्यक्ष अजित घाडगे. जुन्नर तालुका उपाध्यक्ष मजर तिरंदाज..जुन्नर शहर अध्यक्ष मुबीन जमादार.. आंबेगाव तालुका अध्यक्ष नवीन सोनवणे..संघटक संग्राम सावंत.. पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष विलास कोरडे.. कार्याध्यक्ष सचिन माटे.. उपाध्यक्ष मंगेश कोकणे.. पुणे जिल्हा संघटक आदिल शेख.. नगर व पुणे जिल्हा संघटक कल्लू भाई उर्फ नजर अली सय्यद.. भरत मोरे.. इत्यादी मान्यवर यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *