पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – च-होली खुर्द येथील सुभद्रा पॅकेजिंग शॉप येथे ६ जून ते १० जून २०२६ दरम्यान पीपी ओहन बॅग प्रोडक्शनसाठी लागणारा कच्चामाल होलसेल दरात देण्याच्या बहाण्याने एका व्यापाऱ्याची तीन लाख ४७ हजार ८८३ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली.
नीरज अग्रवाल (रा. सुरत) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मगरध्वज संभाजी बिरादार (वय ६४, रा. चक्रपाणी वसाहत रोड, भोसरी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ब्रँडेड पोलिवे मॅन्युफॅक्चरिंग अँड सप्लाय कंपनीचा मालक असल्याचे भासवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फोन पे व बँक खात्यावर आयएमपीएसद्वारे कच्चामालाचे पैसे घेऊनही माल न देता आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत.
Pimpri-Chinchwad – कच्च्या मालाच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक
