Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

पवित्र पवना नदी बनली ‘रसायन वाहिनी’ प्रदूषणामुळे जलचर संपुष्टात, पिंपरी-चिंचवड मनपाचा पर्यावरण विभाग ‘कुंभकर्णी’ निद्रेत!

By Sumedh Chapalgaonkar
June 24, 2026 2 Min Read
0

पिंपरी-चिंचवड :
उद्योगनगरीची जीवनवाहिनी आणि नागरिकांची तहान भागवणारी पवित्र पवना नदी सध्या प्रदूषण आणि प्रशासकीय अनास्थेच्या गर्तेत सापडली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या नदीत सध्या राजरोसपणे घातक रसायनिक पाणी सोडले जात असून, यामुळे पवना नदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. रासायनिक प्रदूषणामुळे नदीतील जलचर केव्हाच संपुष्टात आले असून, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा पर्यावरण विभाग मात्र अजूनही ‘कुंभकर्णी’ निद्रेत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
​
बुधवारी सकाळी पुन्हा नदी फेसाळली
नदीमध्ये रासायनिक पाणी सोडल्यामुळे ती फेसाळण्याच्या घटना आता नित्याच्याच झाल्या आहेत. बुधवारी सकाळी केजूदेवी बंधारा आणि लगतच्या भागात पुन्हा एकदा नदीचे पात्र पांढऱ्याशुभ्र धोकादायक फेसाने माखलेले दिसून आले. नदीवर आलेला फेसाचा जाड थर पाहून परिसरातील नागरिक आणि पर्यावरण प्रेमींमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही नदी आहे की केमिकल वाहून नेणारा नाला? असा उद्विग्न सवाल आता उपस्थित केला जात आहे.

मनपाचा पर्यावरण विभाग फक्त ‘पैसे खायला’ आहे का?
पवना नदीचे हे विदारक रूप पाहून पर्यावरण प्रेमींनी थेट पालिका प्रशासनावर हल्लाबोल केला आहे. “महानगरपालिकेचा पर्यावरण विभाग फक्त कागदोपत्री काम करतोय का? त्यांना नदीचे हे प्रदूषण दिसत नाही की ते जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहेत? हा विभाग केवळ पैसे खायला आणि ठेकेदारांचे खिसे भरायला आहे का?” असा थेट आणि आक्रमक सवाल आता पर्यावरण प्रेमींकडून विचारला जात आहे. ​वारंवार घडणाऱ्या या गंभीर घटनांनंतरही नदीत हे विषारी रासायनिक पाणी कोण सोडतंय, याचा शोध घेण्यास महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

​आयुक्त साहेब, पर्यावरणाच्या गप्पा फक्त भाषणापुरत्याच का?
केवळ पर्यावरणाच्या मोठ्या-मोठ्या गप्पा मारणारे आणि स्वच्छतेचे दावे करणारे महानगरपालिका आयुक्त देखील या अत्यंत संवेदनशील आणि गंभीर घटनेकडे गांभीर्याने पाहत नाहीत, असेच आता म्हणावे लागेल. प्रशासकीय प्रमुखांची ही उदासीनता शहराच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. जर शहरातील मुख्य पाण्याच्या स्रोताची ही अवस्था असेल, तर नागरिकांनी पिण्याचे शुद्ध पाणी कुठून आणायचे?
​लाखो नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या त्या दोषी कंपन्यांवर आणि गुन्हेगारांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा पिंपरी-चिंचवडकर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा आता शहरवासीयांनी दिला आहे.

Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

Pimpri-Chinchwad-भेसळखोरांवर ‘एफडीए’चा बडगा; शहरातील खाद्यव्यवसायात खळबळ सुट्या तेलाची विक्री थांबली; हॉटेल, रेस्टॉरंट आणि पानटपरी चालकांमध्ये धास्ती

Next

अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांचा धडक बडगा; चार कारवायांत हजारोंचा मुद्देमाल जप्त वाकड, दिघी, तळेगाव आणि म्हाळुंगे परिसरात कारवाई; महिला, अल्पवयीनासह पाच जणांवर गुन्हे

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme