ट्रान्सपोर्ट कंपनीची ६५ लाखांची फसवणूक

पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – एका नामांकित ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकाकडून वेळोवेळी ॲडव्हान्स रक्कम घेऊन ६५ लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना डिसेंबर २०२५ ते १२ मार्च २०२६ या कालावधीत भोसरी येथील स्पाईन रोडवरील घडली आहे.
जयंत्रीकुमारी नितेन्द्र प्रसाद (रा. झारखंड) आणि अनिल अरुण नरळे (रा. काळेवाडी, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनिल हरिभाऊ ढोबळे (वय ३५, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींनी संगणमत करून कंपनीला खोट्या बुकिंग ऑर्डर्स दाखवल्या. त्याद्वारे जी. जी. आर. ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक गगन सिंगविर्दी यांच्याकडून वेळोवेळी ॲडव्हान्स स्वरूपात पैसे लाटून एकूण ६५ लाख ६८ हजार ५६५ रुपयांची फसवणूक केली. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *