Pimpri-Chinchwad-विम्‍याच्‍या नावाखाली साडेआठ लाखांची फसवणूक

पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – रुपीनगर परिसरात १ फेब्रुवारी २०२५ ते १० मार्च २०२६ दरम्यान एका व्यक्तीची विमा कंपनीच्‍या कस्टमर सर्विसच्या नावाखाली ८ लाख ७१ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली.
​एका अज्ञात चोरट्याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. अच्युत ज्ञानदेव ससाणे (वय ४५, रा. नवनिर्माण हौसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आयजीएमएस कस्टमर सर्विसमधून बोलत असल्याचे भासवून फिर्यादीकडून पॉलिसीचे कागदपत्रे मागवून घेतली. सर्व पैसे काढून देण्याचे आमिष दाखवून आरोपीने फिर्यादीला ऑनलाइन ८ लाख ७१ हजार रुपये भरावयास लावून फसवणूक केली. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *