पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विविध भागांत एकूण २७ झाडे कोसळल्याने अग्निशमन विभागाची चांगलीच धावपळ उडाली.
३ जुलै रोजी चिंचवडगाव, भोसरी, पिंपरी, निगडी, फुगेवाडी, काळेवाडी, प्राधिकरण आणि पिंपळे सौदागर परिसरात १२ झाडे कोसळली. तर ४ जुलै रोजी निगडी, पिंपळे सौदागर, किवळे, भोसरी, पिंपरी, मोशी, कासारवाडी, दापोडी, आकुर्डी आणि चिंचवड परिसरात आणखी १५ झाडे पडली. या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नागरिकांनी मोठ्या झाडांखाली वाहने उभी करू नयेत तसेच अनावश्यकपणे अशा ठिकाणी थांबणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दोन दिवसांत शहरात २७ झाडे कोसळली भोसरी, निगडी, पिंपरी, चिंचवड आणि पिंपळे सौदागर परिसरात सर्वाधिक घटना; अग्निशमन विभागाची धावपळ
