Pimpri Chinchwad Crime : आर्थिक वादातून तरुणाची आत्‍महत्‍या

Pimpri Chinchwad Crime

पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – (Pimpri Chinchwad Crime) आर्थिक वादातून राहत्‍या घरात गळफास घेत तरुणाने आत्‍महत्‍या केली. ही घटना गुरुवारी (दि. १९ मार्च) रोजी सायंकाळी सात वाजताच्‍या सुमारास घडली. अभिजित सुभाष ठाकुर (वय २६, रा. साने चौक, चिखली) असे आत्‍महत्‍या केलेल्‍या तरुणाचे नाव आहे.

चिखली पोलीस ठाण्‍याचे वरिष्‍ठ निरीक्षक विठ्‌ठल साळुंके यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, अभिजित याने राहत्‍या घरात साडीच्‍या सहाययाने छताच्‍या पंख्‍याला गळफास घेतला. ही बाब कुटुंबियांच्‍या लक्षात येताच त्‍यांनी त्‍यास त्‍वरीत खाली उतरवून रुग्‍णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्‍याचा मृत्‍यू झाल्‍याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. आर्थिक वादातून अभिजित याने आत्‍महत्‍या केल्‍याचे त्‍यांच्‍या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. चिखली पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *