Pimpri Chinchwad RTO : आता शनिवारीही ड्रायव्हिंग टेस्ट आरटीओचा नागरिकांना दिलासा

Pimpri Chinchwad RTO

पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – वाहन चालक परवाना मिळवण्यासाठी ड्रायव्हिंग टेस्टसाठी मिळणाऱ्या अपॉइंटमेंटचा तुटवडा लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) मोठा निर्णय घेतला आहे. आता नागरिकांना शनिवारीदेखील ड्रायव्हिंग टेस्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सध्या ड्रायव्हिंग टेस्टसाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट मिळण्यात मोठी अडचण निर्माण झाली होती. अपॉइंटमेंट स्लॉटची प्रलंबितता वाढल्यामुळे अनेक अर्जदारांना लांबच्या तारखा मिळत होत्या. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आरटीओ प्रशासनाने अतिरिक्त सुविधा म्हणून शनिवारीही अपॉइंटमेंट स्लॉट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अर्जदारांना लवकरात लवकर ड्रायव्हिंग टेस्ट देता येणार असून प्रतीक्षा कालावधी कमी होण्यास मदत होणार आहे.

शनिवारी अपॉइंटमेंट मिळालेल्या सर्व अर्जदारांनी कासारवाडी येथील आयडीटीआर (Institute of Driving Training and Research) केंद्रावर हजर राहून वाहन चालक चाचणी द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी हा निर्णय नागरिकांच्या सोयीसाठी घेतल्याचे स्पष्ट केले असून या सुविधेमुळे ड्रायव्हिंग लायसन्स प्रक्रियेला गती मिळणार असल्याचे सांगितले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *