Pimpri chinchwad crime : बांधकाम व्‍यावसायिकाची ५२ लाखांची फसवणूक

Pimpri chinchwad Crime-बांधकाम व्‍यावसायिकाच्‍या कार्यालयातून प्लॉट विक्रीच्या व्यवहारात संगनमत करून तब्बल ५२ लाख ४३ हजार ५०० रुपयांची फसवणूक करण्‍यात आली. ही घटना काळेवाडी फाटा येथील सत्यम डेव्हलपर्स यांच्‍या कार्यालयात घडली.

उमेश संभाजी कर्णे (वय ३८, मूळ रा. जांभ, ता. मुखेड, जि. नांदेड, सध्या रा. सनसाइन नगर, नखातेवस्‍ती, रहाटणी) व संतोष उर्फ संदीप बाबराव पाटील (वय ४३, रा. मु. पो. वाळवा, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर, सध्या रा. वर्धमान हाइटस्‌, छत्रपती चौक, रहाटणी) यांनी गुरुवारी (दि. १९) याबाबत काळेवाडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

ही घटना २५ जानेवारी २०२५ ते २३ मे २०२५ या कालावधीत काळेवाडी फाटा येथील सत्‍यम डेव्‍हलपर्स याच्‍या कार्यालयात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्यम डेव्हलपर्सच्या भागीदारी संपल्यानंतरही आरोपींना विश्वासाने विक्रीची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र त्यांनी खरेदीदारांकडून पैसे घेऊन ते कंपनीच्या खात्यात न भरता स्वतःच्या व नातेवाईकांच्या खात्यात वळवले. तसेच बनावट पावत्या देऊन विश्वासघात केला. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *