पिंपरी, दि. २७ (pimpri chinchwad crime) – महाळुंगे येथील निघोजे परिसरात भरधाव कार चालविणाऱ्या चालकाने वादातून एका व्यक्तीवर गॅस सिलेंडर फेकून मारला. तसेच दगडाने मारहाण केली. ही घटना घटना बुधवारी (दि. २५ मार्च) रोजी रात्री आठच्या सुमारास घडली.
स्विफ्ट कार (एमएच १२-५१५४) वरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी नंदु भारत सांगोलकर (वय ३०, रा. लोणी काळभोर) यांनी गुरुवारी (दि. २६ मार्च) रोजी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने भरधाव वेगाने गाडी चालवत फिर्यादीच्या दिशेने येताच फिर्यादीने बाजूला उडी मारली. त्यानंतर वाद झाल्याने आरोपीने संतापून जवळच्या गॅरेजमधील पाच किलो वजनाचा गॅस सिलेंडर फेकून मारला तसेच दगडाने कपाळावर मारून करून जखमी केले. तसेच बुक्क्यांनी मारहाण करत धमकीही दिली. या प्रकरणाचा तपास दक्षिण महाळुंगे पोलीस करत आहेत.
