pimpri chinchwad crime-गॅस टँकरमधून घरगुती टाकीत गॅस चोरी; तिघांना अटक

पिंपरी, दि. १ (pimpri chinchwad crime) – गॅस टँकरमधून बेकायदेशीरपणे घरगुती सिलिंडरमध्ये गॅस भरणाऱ्या टोळीवर पोलिसांनी छापा टाकला. मंगळवारी पहाटे पावणे पाच वाजताच्‍या सुमारास केलेल्‍या या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४९ लाख ५७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तिघांना अटक केली आहे.

टँकर चालक अंबादास रोहीदास गाडे (वय ४२, रा. चेंबूर, मुंबई, मूळ रा. परळी वैजनाथ, जि. बीड), अक्षय रमेश मुंगसे (वय २५, रा. रासे, ता. खेड, जि. पुणे) आणि नवनाथ अंकुश होजगे (वय ३४, रा. भोसे, ता. खेड, जि. पुणे) अशी अटक केलेल्‍या आरोपींची नावे आहेत. पोलीस हवालदार भैरोबा मनोहर यादव (वय ३९) यांनी मंगळवारी (दि. ३१) चाकण पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. ३१) पहाटे पावणेपाचच्या सुमारास भोसे गावातील इंडियन ऑइल गॅस प्लांटच्या शेजारील पार्किंगमध्ये काही जण गॅसची चोरी करत असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने छापा टाकला असता, आरोपी गॅस टँकरचे (कॅप्सूल) सील तोडून काळ्या रंगाच्या नोझल पाइपद्वारे घरगुती टाक्यांमध्ये गॅस भरत होते. कोणत्याही सुरक्षा उपकरणांशिवाय हा जीवघेणा प्रकार सुरू होता.

गॅस टँकरसह ४९ लाख ५७ हजार ६०० रुपयांचा सर्व मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरवडे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *