pimpri chinchwad crime-पैसे मागितल्याच्या रागातून कामगाराला मारहाण

पिंपरी, दि. ६ (pimpri chinchwad crime) – ऑनलाइन पाठवलेले पैसे परत मागितल्यामुळे दोन जणांनी एका कामगाराला शिवीगाळ करत काठीने डोक्यात आणि पाठीत मारहाण करून जखमी केले. ही घटना शनिवार (दि. ४ एप्रिल) रोजी सकाळी ११ वाजताच्‍या सुमारास खंडोबा माळ, भोसरी येथील जलशुद्धीकरण केंद्रावर घडली.

भूपेंद्र लक्ष्मण जाधव (वय ४५, रा. लांडेवाडी, भोसरी) यांनी रविवारी (दि. ६ एप्रिल) रोजी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रवीण गायकवाड (वय ४०) आणि रणजित यादव (वय ३५, दोघेही रा. खंडोबा माळ, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे खंडोबा माळ भोसरी येथील जलशुद्धीकरण केंद्रात काम करतात.

त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या सुपरवायझरने झाडू खरेदी करण्यासाठी आरोपीच्या फोन पे नंबरवर पैसे पाठवले होते. फिर्यादीने ते पैसे मागितले असता “तू आमच्याकडे पैसे का मागतो” असे म्हणून आरोपींनी वाद घातला. प्रवीणच्या सांगण्यावरून रणजितने हातातील काठीने फिर्यादीला डोक्यात, पाठीत, पायावर आणि हातावर मारहाण केली. भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *