pimpri chinchwad crime-दुचाकीवरून गांजाची वाहतूक करणाऱ्याला पकडले

पिंपरी, दि. ६ (pimpri chinchwad crime) – विक्रीसाठी बेकायदेशीरपणे गांजा घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीला अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. ही कारवाई रविवारी (५ एप्रिल) सायंकाळी सात वाजता, गोडाऊन चौक, एम.आय.डी.सी. भोसरी येथे करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत जाधव यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सरोज रामकृष्णप्रसाद सिंग (६०, मोशी) याला अटक केली असून त्याची पत्नी वंदनादेवी सरोज सिंग हिच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या ताब्यातून ५,६०० रुपये किमतीचा ११२ ग्रॅम गांजा, एक दुचाकी आणि मोबाइल असा एकूण एक लाख ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चौकशीत आरोपीने सांगितले की, त्याची दिव्यांग पत्नी वंदनादेवी हिने हा गांजा विक्रीसाठी आणून दिला होता. एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *