pimpri chinchwad crime-दारुड्या पतीकडून पत्नीला सांडशीने मारहाण

​पिंपरी, दि. ९ (pimpri chinchwad crime) – एका व्यक्तीने दारूच्या नशेत आपल्या पत्नीला किरकोळ कारणावरून सांडशीने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. ८ एप्रिल) रोजी दुपारी दोन वाजताच्‍या सुमारास तळेगाव दाभाडे येथील मंत्रा सिटी सोसायटीत घडली.

संजय हिरामण पाटील (वय ५०, रा. मंत्रा सिटी, तळेगाव दाभाडे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे. याबाबत त्‍याची पत्‍नी पीडित महिलेने बुधवारी (दि. ८ एप्रिल) रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ​

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजताच्‍या सुमारास आरोपी संजय पाटील हा दारू पिऊन घरी आला आणि पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करू लागला.

पत्नीने प्रतिकार केला असता, रागाच्या भरात त्याने किचन ओट्यावरील सांडशी उचलून पत्नीच्या डोक्यात मारली, ज्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. तळेगाव दाभाडे पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *