Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

क्राईमपिंपरी-चिंचवड

तीन महिन्‍यात शहरातील ७६ सराईत तडीपार पोलीस आयुक्‍तांचा दणका; गुन्हेगारी जगतात खळबळ

By Team News Beez
April 13, 2026 2 Min Read
0

पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीसांनी मोठी कारवाई केली आहे. जानेवारी ते मार्च २०२६ या तीन महिन्यांत तब्बल ७६ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.
चारही परिमंडळांनी समन्वयाने कारवाई केली. परिमंडळ एक अंतर्गत १४ गुन्हेगारांवर कारवाई झाली. यामध्ये खुनाचा प्रयत्न आणि जबरी चोरीतील आरोपींचा समावेश आहे. परिमंडळ दोन मध्ये १९ जणांना तडीपार करण्यात आले. अवैध दारू आणि टोळी वादातील आरोपी यामध्ये होते.
परिमंडळ तीन मध्ये सर्वाधिक २६ गुन्हेगारांना जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात आले. भोसरी एमआयडीसी, चाकण आणि आळंदी परिसरातील टोळ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. परिमंडळ चार मध्ये १७ जणांवर कारवाई झाली. काहींना सहा महिने तर काहींना दोन वर्षांपर्यंत हद्दपार करण्यात आले आहे.
तडीपार करण्यात आलेल्या आरोपींमध्ये खुनाचा प्रयत्न, दरोडा, विनयभंग, अवैध शस्त्र बाळगणे आणि अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांचा समावेश आहे. टोळीप्रमुखांसह त्यांच्या सदस्यांवर एकाच वेळी कारवाई करण्यात आली. त्यामुळे गुन्हेगारी टोळ्यांना मोठा धक्का बसला आहे.
पोलिसांनी केवळ कारवाई करून थांबलेले नाहीत. तडीपार गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. सध्या शंभरहून अधिक संशयित पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांच्यावरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. तडीपार गुन्हेगार शहरात दिसल्यास तात्काळ माहिती द्यावी, असे सांगण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
या कारवाईमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था मजबूत होण्यास मदत होणार आहे. नागरिकांनीही सुटकेचा निःश्वास सोडला असून गुन्हेगारीविरोधातील ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत पोलीसांनी दिले आहेत.
—
कारवाईची वैशिष्‍ठ्ये
– खून, दरोड्यातील आरोपींवर कारवाई
– टोळीप्रमुखांसह सदस्यांना हद्दपार
– विशेष पथकांकडून हालचालींवर नजर
– १०० हून अधिक संशयित रडारवर
– नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन

Tags:

पिंपरी-चिंचवड पोलीसभोसरी एमआयडीसी
Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

pimpri chinchwad crime-कंपनीत कामाच्या वादातून कामगारावर रॉडने हल्ला; डोक्याला पडले आठ टाके

Next

श्री महागणपती मंदिर, रांजणगाव जतन व दुरुस्ती कामांसाठी १५ एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत बंद

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
  • बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल
  • दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

CATEGORIES

  • Uncategorized (439)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (877)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme