निघोजे परिसरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

महिंद्रा कंपनीच्या गेटसमोर सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणाऱ्या टोळीवर गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. ही घटना मंगळवारी (१४ एप्रिल) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास निघोजे गावच्या हद्दीत स्वामी चहा जवळील फूटपाथवर घडली.

या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल वेताळ यांनी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आयुब युसुफ खान (५५, म्हाळुंगे), गणेश सुरेश धोंगडे (२६, म्हाळुंगे) आणि सुनील रज्जु साहु (२५, म्हाळुंगे; मूळ रा. मध्यप्रदेश) या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे ‘थ्री पत्ती फाईव्ह स्टार सोरट’ नावाचा जुगार खेळवत असताना रंगेहाथ पकडले गेले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य आणि ३,२०० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपींना नोटीस देण्यात आली आहे. दक्षिण महाळुंगे पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *