सांगवी परिसरात दोन पिस्तूल आणि काडतुसांसह दोन तरुणांना अटक

पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – बेकायदेशीररीत्या पिस्तूल बाळगणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. १५ एप्रिल) रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास जुनी सांगवी येथील औंध जिल्हा रुग्णालयाजवळील पॉवर हाऊसजवळ करण्यात आली.
साहिल दत्तात्रय साष्टे (वय १९, रा. कोथरूड, पुणे) आणि विठ्ठल साई वाशिवले (वय १९, रा. कोथरूड, पुणे) अशी गुन्‍हा दाखल केल्‍यानंतर अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कॉन्स्टेबल आकाश खंडागळे यांनी बुधवारी (दि. १५ एप्रिल) रोजी या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन तरुण जुनी सांगवी येथील औंध जिल्हा रुग्णालयाजवळील पॉवर हाऊसजवळ संशयितपणे फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपींकडे घातक शस्त्रे असल्याची माहिती मिळाल्यावर ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १ लाख रुपये किमतीची दोन देशी बनावटीची पिस्तूल, ४ हजार रुपयांची चार जिवंत काडतुसे आणि ५० हजार रुपयांची ॲक्टिव्हा दुचाकी असा एकूण १ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सांगवी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *