पिरंगुटमध्ये जुन्या वादातून मारहाण; महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल

पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – पिरंगुट कॅम्प परिसरात भाजी आणण्यास गेलेल्या सुनेला आणि जाब विचारण्यास गेलेल्या सासूला जुन्या वादातून लाकडाने व हाताने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. १७ एप्रिल) रोजी दुपारी बारा वाजताच्‍या सुमारास घडली आहे.
​सोना साथळीया, तिचा भाऊ जयेश आणि एक महिला (भावजय) (सर्व रा. पिरंगुट कॅम्प, पुणे) अशी गुन्हा दाखल करण्‍यात आलेल्‍या आरोपींची नावे आहेत. मीना दशरथ राजकोटीया (वय ६५, रा. पिरंगुट कॅम्प, ता. मुळशी, जि. पुणे) अशी जखमी झालेल्‍या महिलेचे नाव असून त्‍यांनी शुक्रवारी (दि. १७ एप्रिल) रोजी बावधन पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली आहे.
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मीना यांची सून शितल राजकोटीया ही शुक्रवारी दुपारी बारा वाजताच्‍या सुमारास भाजी आणण्यासाठी दुकानात जात असताना आरोपी सोना साथळीया हिने जुन्या वादाचा राग मनात धरून तिला शिवीगाळ केली. फिर्यादीने याचा जाब विचारला असता, सोनाने त्यांनाही मारहाण केली. यावेळी सोनाचा भाऊ जयेश याने लाकडाने मारहाण करून फिर्यादीच्या हातावर, मानेवर आणि पायावर दुखापत केली.तसेच भावजय हिनेही सून शितल हिला शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. बावधन पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक पवार या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *