पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – हिंजवडी आयटी पार्क परिसरात चुकीच्या बाजूने (रॉग साईड) रिक्षा चालवून प्रवाशांच्या आणि स्वतःच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या रिक्षाचालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. १७ एप्रिल) रोजी दुपारी पावणे एक वाजताच्या सुमारास करण्यात आली.
बाबासाहेब सखाराम सोळंके (पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. मोहम्मद सलमान (वय ३३, रा. हिंजवडी फेज १, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी शनिवारी (दि. १८ एप्रिल) रोजी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहम्मद हे शुक्रवारी दुपारी पावणे एक वाजताच्या सुमारास शिवाजी चौकाजवळील एसबीआय बँकेसमोरील सार्वजनिक रोडवर असताना आरोपी सोळंके याने आपली रिक्षा (क्र. MH 12 LY 1065) अत्यंत निष्काळजीपणे आणि बेदरकारपणे रॉग साईडने चालविली. यामुळे फिर्यादी आणि त्यांच्या मित्राच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. या प्रकरणाचा पुढील तपास हिंजवडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक कांदे करत आहेत.
हिंजवडीत रॉग साईडने आलेल्या रिक्षा चालकावर गुन्हा
