पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – मारुंजी रोडवर सार्वजनिक रस्त्यावर गावठी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस घेऊन फिरणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवार (दि. १९ एप्रिल) रोजी सायंकाळी ७:२० वाजण्याच्या सुमारास फलो हॉटेलसमोर करण्यात आली.
पोलीस कॉन्स्टेबल अजित शिंदे यांनी रविवारी (दि. १९ एप्रिल) रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राकेश वासुदेव येवले (वय ३४, रा. कान्हेवाडी, ता. मावळ, जि. पुणे) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना त्याने ३५ हजार रुपये किमतीचे एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस बाळगले होते. हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
हिंजवडीत गावठी पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक
