पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. ही कारवाई शनिवार (दि. १८ एप्रिल) रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास तापकीर मळा, काळेवाडी येथे करण्यात आली.
आशिष एकनाथ शेटे (वय २६, रा. रहाटणी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस कॉन्स्टेबल शुभम कदम यांनी रविवारी (दि. १९ एप्रिल) रोजी याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात शस्त्र बाळगण्यास मनाई आदेश लागू असताना आरोपीने स्वतःच्या ताब्यात ५० हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल आणि २ हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे बाळगली होती. गुंडा विरोधी पथकाने सापळा रचून त्याला मुद्देमालासह ताब्यात घेतले. काळेवाडी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक
