पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – अनुभव नसतानाही मशीनवर काम करण्यास सांगितल्याने डाय क्लोज होऊन एका कामगाराच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. ही घटना रविवार (दि. १२ एप्रिल) रोजी रात्री ८:४५ वाजण्याच्या सुमारास समर्थ इंडस्ट्री, चाकण येथे घडली.
तात्या रामा चव्हाण (वय ४१, रा. चाकण, ता. खेड, जि. पुणे) यांनी रविवारी (दि. १९ एप्रिल) रोजी याप्रकरणी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंपनीचे विभाग प्रमुख चौधरी (समर्थ इंडस्ट्री, चाकण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला नवीन प्लॅन्टमधील डायकास्टिंग मशीनवर काम करण्याचा अनुभव नव्हता. तरीही विभाग प्रमुखांनी त्यांना काम करण्यास सांगितले. मशीनमध्ये अडकलेला कचरा काढत असताना अचानक डाय क्लोज झाली. यामध्ये फिर्यादीचा डावा हात मनगटापासून पुढे अडकला आणि पंजा व बोटे तुटली. उत्तर चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
कंपनीच्या हलगर्जीपणामुळे कामगाराचा हात जायबंदी
