पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – एका घराच्या पाठीमागे मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या चार जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई रविवार (दि. १९ एप्रिल) रोजी सायंकाळी ५:१५ वाजण्याच्या सुमारास मावळ तालुक्यातील जयहिंद कंपनीच्या समोर, उर्से येथे करण्यात आली.
पोलीस कॉन्स्टेबल रोशन डोंगरे यांनी रविवारी (दि. १९ एप्रिल) रोजी शिरगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार हनुमंत विश्वनाथ पवळ (वय ४३), समाधान केरप्पा दूधभाते (वय ३३), वैजीनाथ पंडा दूधभाते (वय ४४) आणि सुनील मास्ती लोखंडे (वय ४२, सर्व रा. उर्से, ता. मावळ, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना तीन पानांचा पत्त्यांचा जुगार खेळत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून एक हजार ८३० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. शिरगाव पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
उर्से येथे पत्त्यांच्या जुगारावर कारवाई; चौघांवर गुन्हा
