पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – ऑनलाइन माध्यमातून पत्नी आणि आईचे मॉर्फ केलेले नग्न फोटो पाठविले. तसेच व्हायरल केलेले फोटो सोशल मीडियावरून काढून टाकण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना १६ एप्रिल ते १८ एप्रिल २०२६ दरम्यान ऑनलाइन स्वरूपात घडली.
याबाबत एका व्यक्तीने रविवारी (दि. १९ एप्रिल) रोजी रावेत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी ऋषीकेश भाऊसाहेब शिंदे (रा. हिंजवडी फेज-३, ता. मुळशी, जि. पुणे) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून फिर्यादी, त्यांची होणारी पत्नी आणि त्यांच्या मित्रांना फिर्यादीच्या होणाऱ्या पत्नीचे व आईचे अश्लील फोटो पाठवले. हे फोटो काही पॉर्न वेबसाईटवर अपलोड करून तेथून काढून टाकण्यासाठी त्याने पाच लाख रुपयांची मागणी केली. या कृत्यामुळे फिर्यादीच्या कुटुंबाची बदनामी झाली आहे. रावेत पोलीस तपास करत आहेत.
व्हायरल केलेले मॉर्फ फोटो काढून टाकण्यासाठी पाच लाखांची मागणी
