पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – पवना नदीच्या कडेला मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू तयार करण्यासाठी भिजत घातलेले पाच लाख २५ हजार रुपयांचे कच्चे रसायन पोलिसांनी जप्त केले आहे. ही कारवाई रविवार (दि. १९ एप्रिल) रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास शिरगाव येथे करण्यात आली.
पोलीस कॉन्स्टेबल सागर कोळी यांनी रविवारी (दि. १९ एप्रिल) रोजी याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यामध्ये एका महिला आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला हिने बेकायदेशीरपणे हातभट्टी दारू तयार करण्यासाठी नदीकाठी पाच लाख २५ हजार रुपये किंमतीचे १५ हजार लिटर गुळमिश्रित कच्चे रसायन भिजत घातले होते. पोलिसांनी या कारवाईत प्रोव्हिजनचे साहित्य जप्त केले आहे. शिरगाव पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
शिरगाव येथे हातभट्टी दारूचे रसायन जप्त; महिलेवर गुन्हा
