फ्लॅट विक्रीत ९२ लाखांची फसवणूक; दोन बँकांचे कर्ज असतानाही केला व्यवहार

पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – पिंपरी येथील एका फ्लॅटवर दोन बँकांचे कर्ज असताना केवळ एकाच बँकेचे कर्ज असल्याची खोटी माहिती देऊन एका व्यक्तीची ९२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ४ जानेवारी २०२२ ते १४ नोव्‍हेंबर २०२५ या कालावधीत घडली.
​युनुस मोहम्मद शेख (वय ४९, रा. इंद्र विहार बिल्‍डींग, देहुरोड, किवळे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर आबासाहेब कासार (वय ४१, रा. कोहिनूर टॉवर, पिंपरी) यांनी सोमवारी (दि. २० एप्रिल) रोजी पिंपरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नुुस शेख याने फिर्यादी ज्ञानेश्‍वर कासार यांना कोहिनूर टॉवर येथील ए विंग मधील ४०४ क्रमांकाचा फ्लॅट विक्री केला. या फ्लॅटवर ॲक्सिस बँक आणि बँक ऑफ इंडिया या दोन्ही बँकांचे कर्ज होते. मात्र, आरोपीने केवळ बँक ऑफ इंडिया या एकाच बँकेचे कर्ज असल्याचे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला आणि एकूण ९२,००,००० रुपयांची आर्थिक फसवणूक केली. पिंपरी पोलीस ठाण्‍यातील निरीक्षक पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *