पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्या एका अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई चाकण जवळील खराबवाडी परिसरात सोमवारी (दि. २० एप्रिल) रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास करण्यात आली.
पोलीस अंमलदार राजकुमार दामोदर हनुमंते यांनी सोमवारी (दि. २० एप्रिल) रोजी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका अल्पवयीन मुूलाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी खराबवाडी येथील सारा सिटीजवळ एक संशयित अल्पवयीन मुलगा आढळून आला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २६ हजार रुपये किमतीचे सिल्व्हर रंगाचे गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे मिळून आली. पोलीस आयुक्तांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सहायक पोलीस फौजदार सुपेकर या गुन्ह्याचा तपास करत आहेत
खराबवाडीतून पिस्तुलासह अल्पवयीन ताब्यात
