​किराणा दुकानदाराला लाकडी दांडक्याने मारहाण

​पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील निघोजे येथे पाणी टॅकरमुळे वायरींग तुटल्‍याच्‍या कारणावरून एका किराणा दुकानदाराला लाकडी दांडक्याने मारहाण करण्‍यात आली. ही घटना गुरुवार, (दि. २३ एप्रिल) रोजी दुपारी १२:०० वाजताच्या सुमारास सुभाषवाडी येथे घडली.
​संदिप एकनाथ हुळवळे (वय ३८, रा. विग्नहर्ता बिल्डींग, सुभाष वाडी, निघोजे, ता. खेड, जि. पुणे) यांनी गुरुवारी (दि. २३ एप्रिल) रोजी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सचिन शिंदे (रा. सुभाषवाडी, निघोजे, ता. खेड) याच्‍या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला नोटीस बजावली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हुळवळे हे त्यांच्या किराणा दुकानात काम करत असताना आरोपी सचिन शिंदे तिथे आला. “फापाळे यांच्या बिल्डींगमध्ये पाणी सोडण्यासाठी आलेल्या टँकरने माझ्या बिल्डींगचे वायर तुटले आहेत, ते भरून दे” असे म्हणत त्याने हुळवळे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपीने लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांना जखमी केले. दक्षिण महाळुंगे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *