पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – श्रीलक्ष्मी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलची वीज यंत्रणा टँकरमुळे खंडित झाली. याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या डॉक्टरला काही जणांनी महिलेसह तीन जणांनी लाठ्या आणि दगडांनी मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. २३ एप्रिल) रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील निघोजे येथे घडली.
सचिन चिमाजी शिंदे (वय ३६ वर्षे, रा. निघोजे, ता. खेड) असे मारहाणीत जखमी झालेल्या डॉक्टरचे नाव असून त्यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. २३ एप्रिल) रोजी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेश येळवंडे, कैलास फाफाळे, संदिप हुळवले यांच्या पत्नीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलला विद्युत पुरवठा होणारी डीपी मधील वायर आरोपींनी मागविलेल्या टॅन्करमुळे तुटली होती. त्यामुळे हॉस्पिटलचा वीज पुरवठा खंडीत झाला. याबाबत विचारणा करण्यासाठी डॉ. सचिन शिंदे हे आरोपींकडे गेले होते. आरोपींनी त्याचा राग धरून त्यांना शिवीगाळ केली आणि फायबर लाठी, झाडू व दगडाने मारहाण करीत डॉक्टरांना जखमी केलीे. दक्षिण महाळुंगे पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
वायर तुटल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून डॉक्टरला मारहाण
