​घरगुती गॅस सिलेंडरची अवैध रिफिलिंग; एकाला अटक

पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – घरगुती गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीररीत्या छोट्या टाक्यांमध्ये गॅस भरणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई खेड तालुक्‍यातील मेदनकरवाडी येथे गुूरुवारी (दि. २३ एप्रिल) रोजी दुपारी साडेबारा वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली आहे.
​याप्रकरणी तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक महादेव अर्जुन कुंभार यांनी गुरुवारी (दि. २३ एप्रिल) रोजी दक्षिण चाकण पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिपक सिंग (वय ३२, रा. मेदनकरवाडी, ता. खेड, जि. पुणे) याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करीत त्‍यास अटक केली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी साडेबारा वाजताच्‍या सुमारास आरोपी दीपक सिंग हा खंडेराय गॅस एजन्सी या दुकानात कोणताही परवाना नसताना आणि सुरक्षेची काळजी न घेता मोठ्या टाक्यांमधून पाच किलोच्या टाक्यांमध्ये गॅस रिफिलिंग करत होता. त्याच्याकडून २१ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दक्षिण चाकण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *