पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) – आपल्याच मुलाला उचलून घेतल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी जावयाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांचा जबडा फॅक्चर केला. ही घटना बोपखेल येथे १८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली आहे.
निखिल कमलाकर सरोदे (रा. रामनगर, बोपखेल) असे गुन्हा दाखल झाल्यावर अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच पत्नी अनिशा राहुल सरवदे हिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गौतम सरवदे (वय २९ वर्ष, रा. बीड) असे जखमीचे नाव असून त्यांनी शुक्रवारी (दि. २४ एप्रिल) रोजी याप्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल हे बोपखेल येथे राहणाऱ्या आपल्या सासरच्या घरी गेले होते. तिथे त्यांनी आपला मुलगा आयुष याला उचलून घेतल्याच्या कारणावरून आरोपींनी त्यांच्याशी वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन आरोपींनी राहुल यांना बेदम मारहाण केली, ज्यामध्ये त्यांच्या जबड्याच्या दाढेला फॅक्चर होऊन ते गंभीर जखमी झाले आहेत. दापोडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
मुलाला उचलून घेतल्याच्या कारणावरून जावयाला मारहाण; जबडा फॅक्चर
