आळंदीत तरुणाकडून गांजा जप्त

पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – गांजा विक्री करण्‍यासाठी आलेल्‍या एका तरुणावर पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. ही कारवाई आळंदी-मरकळ रोडवर सटवाई माता मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या मैदानात शनिवार (दि. २५ एप्रिल) सायंकाळी सव्‍वाचार वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस शिपाई स्वामी विठ्‌ठल नरवडे यांनी शनिवारी (दि. २५ एप्रिल) रोजी आळंदी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शिवप्रेम शुक्खू चौहान (वय २५, रा. चऱ्होली खुर्द, ता. हवेली, जि. पुणे; मूळ रा. हनुमान गंज बस्‍ती, उत्तर प्रदेश) असे गुन्‍हा दाखल करण्‍यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवप्रेम याच्या ताब्यातून ६० हजार ५०० रुपये किमतीचा एक किलो २१० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. तो हा अंमली पदार्थ बेकायदेशीरपणे विक्री करण्यासाठी घेऊन आला होता. आळंदी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *