गांजा विक्री प्रकरणी बीडच्‍या तरुणावर गुन्‍हा दाखल

पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – तळवडे येथील सोनवणे वस्तीत सार्वजनिक रोडवर विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्या एका तरुणावर पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. २५ एप्रिल) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास श्री मेडिकलच्या समोर करण्यात आली.
साहिल राहुल चौरे (वय २०, रा. लक्ष्‍मीनगर, एस. बी. पाटील कॉलेजच्‍या पाठीमागे, रावेत, पुणे; मूळ रा. भीमनगर, परळी वैजनाथ, जि. बीड) असे गुन्‍हा दाखल केलेल्‍या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार कंठय्या स्वामी यांनी शनिवारी (दि. २५ एप्रिल) रोजी चिखली पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साहिल याच्याकडे आठ हजार ८०० रुपये किमतीचा १७६ ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. हा अंमली पदार्थ तो विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगत असताना पोलिसांनी कारवाई केली. चिखली पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *